सप्तश्रृंगी गडावर वरवंडीच्या तरुणाचा खून ; संशयित पोलिसांच्या ताब्यात

0
43

सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सप्तश्रृंगी गड परिसरातील जंगलात गुरुवारी (दि १८) रोजी आढळून आलेला मृतदेह तालुक्यातील वरवंडी येथील तरुणाचा असल्याची माहिती मिळाली असून, पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे .

या घटनेबाबत कळवण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्तश्रृंगी गड परिसरातील जंगलात गुरुवारी (दि १८) रोजी वरवंडी ता देवळा येथील प्रवीण रावसाहेब गवळी (१८) या तरूणाचा मुत्यु देह आढळून आला आहे .

या घटनेची माहिती येथील नागरिकांनी पोलीस ठाण्यात कळवली . घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला . या तरुणाचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून ,कळवण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरवंडी येथील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

अधिक तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान , या घटनेबाबत वरवंडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ,या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी , अशी करण्यात आली आहे . मृत प्रवीण गवळी याच्या पश्चात आई ,वडील भाऊ असा परिवार आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here