नाशिक प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आला असून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने चानशी शिवारात दोन हुक्का पार्लरवर छापा टाकला असून मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेतले आहे. या मध्ये मोठे हस्ती सापडण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘हॉटेल स्टड फार्म’ तसेच जलालपूर गावाच्या शिवारात हॉटेल रायबा येथे अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती होती यावरून अधीक्षक पाटील यांनी विशेष पथक तयार करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली आहे.
चांद्शी शिवारात हॉटेल स्टड फार्मवर छापा टाकून जमीन हुसेन शेख ( रा. सनस्टार अव्हेन्यू बिल्डींग ता. जि. नाशिक ), समाधान रामनाथ शिंदे ( रा. वाढोली, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक ), मनोज कारभारी दिवे ( रा. चांदशी ता.जि. नाशिक ) यांनी संगनमत करून बेकायदेशीर प्रतिबंधीत तंबाखुजन्य हुक्का सेवनासाठी पुरविला व जागा उपलब्ध करून दिली. या छाप्यामध्ये ०३ हुक्का पॉट, सुगंधी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर व इतर हुक्क्याचे साहित्य , साधने असा एकुण ४,०७०/ रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यानंतर विशेष पथकांनी जलालपुर गावचे शिवारात हॉटेल रायबा येथे रात्री अचानक छापा टाकत कुणाल राजेंद्र म्हैसधुणे रा. मु.पो. मुंगसरा ता. जि. नाशिक (हॉटेल मालक) व मोहन गणेश घुगे रा. श्रीभवण रेसिडन्सी, फ्लॅट नंबर १, हिरावाडी रोड, महाराष्ट्र कॉलनी, पंचवटी, नाशिक अशांनी संगनमत करून बेकायदेशीररित्या प्रतिबंधीत तंबाखुजन्य हुक्का सेवनासाठी पुरविला व जागा उपलब्ध करून दिली होती.
या छाप्यामध्ये ०८ हुक्का पॉट, तंबाखुजन्य सुगंधी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर व इतर हुक्क्याचे साहित्य व साधने असा एकुण १०हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या वपोनी सारीका अहिरराव करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम