नाशिक प्रतिनिधी : आजपासुन पुढील ५ दिवस अर्थात ८ एप्रिल पर्यंत मुंबई ठाणे सह संपूर्ण कोकण, नाशिक सह खान्देश तसेच नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच आज व उद्या(४, ५) नागपूर सह विदर्भात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच वीजा गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
द्राक्षे व कांदा काढणी सध्या चालु असुन शेतकऱ्यांनी त्यासंबंधी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सध्या ठळक एव्हढेच! अजुन काही बदल झाल्यास कळविले जाईल असे देखील खुळे यांनी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम