वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून करण्यात आली हत्या

0
42

द पॉईंट नाऊ ब्युरो : ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यात वृद्ध दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भिवंडी तालुक्याच्या अकलोली भागात ही घटना घडली. मत्स्यशेतीत काम करणाऱ्या मजुराने वृद्ध दाम्पत्याची हत्या केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी समशूला खान हा या दाम्पत्याकडे कामाला होता. त्याच्या कामावरून हत्या करण्यात आलेले वृद्ध जगन्नाथ हे त्याला रागवत असत. याच कारणास्तव राग मनात ठेवून समशूला याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून हत्या केल्याचं बोललं जात आहे.

समशूलला या घटनेत त्याचे साथीदार मकसूद खान, रोहित कनोजी यांनी मदत केली. याप्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here