विसर्जन मिरवणुकीवर बंदी सहकार्य करण्याचे निफाड नगरपंचायतचे आवाहन

0
41

प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव बघता निफाड नगरपंचायत कडून शहरातील सर्व गणेश भक्तांना आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या साथीमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी या ही वर्षी गणेश विसर्जनाची कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली असून गणेश भक्तांनी निफाड नगरपंचायत व निफाड पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करून सहकार्य करावे. हे शक्य नसल्यास निफाड नगरपंचायतने तयार केलेल्या शहरातील कृत्रिम विसर्जन ठिकाणांवर गणेश मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे. शहरातील गणेश मंडळ व गणेश भक्त परस्पर नदीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करु नये असं सांगितलं आहे.

सर्वांनी सहकार्य करा व पर्यावरणाची हानी टाळा. असे आवाहन निफाड पोलिस निरीक्षक रंगराव सानप. मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके निफाड नगरपंचायत, निफाड यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here