विष्णूनगर जवळ ट्रक व ट्रॅक्टरचा अपघात ;ट्रॅक्टर चालक जखमी

0
46

निफाड (प्रतिनिधी)ता.२६ विंचूर पासून जवळच असलेल्या विष्णूनगर फाट्यावर ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने अपघात होवून ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाला.यात ट्रॅक्टर चालक जखमी झाला.

नाशिक औरंगाबाद महामार्गाने शिंदेवाडी ता.सिन्नर येथील शरद घोटेकर शेतकरी ता.२६ रोजी सकाळी ६.४५ वाजेच्या दरम्यान विंचूर उपबाजार समितीकडे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर क्र.एम एच १५ एच एम ३८५३ कांदे विक्रीसाठी घेवून जात असतांना विष्णूनगर फाट्याजवळ ट्रक क्र.एम एच १८ बी जी ३२८१ ने पाठीमागून ट्रॅक्टरला धडक दिली.यामध्ये ट्रॅक्टरसह कांद्याने भरलेली ट्रॉली महामार्गावर पलटी होवून ट्रॉलीतील कांदे रस्त्यावर पडले.

त्यामुळे शेतकर्‍याच्या कांद्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.ट्रॅक्टर चालक जखमी झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.ट्रॅक्टर रस्त्यातच पलटी झाल्याने वाहतुक काहीकाळ बंद झाली होती परंतु  पोलीसांनी घटनास्थळी येवून स्थानिक नागरिकांच्या मदतीने कांदे दुसर्‍या ट्रॅक्टरमध्ये भरून देवून वाहतुक सुरळीत केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here