द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात खुनाचे स्तर सुरूच आहे. खुनाच्या घटना काही कमी होण्याचे चिन्हे दिसून येत नाहीत. नाशिक येथील द्वारका परिसरात (Dwarka) एका युवकाचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मॉर्निंग वॉकला (Morning Walk) गेलेल्या काही नागरिकांनी पोलीस सूत्रांना दिली. यामुळे पुन्हा शहरात खळबळ उडाली . वाईन सिटीची ओळख क्राईम सिटी म्हणून होतेय अशी चर्चा रंगू लागली.
शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास द्वारका परिसरात असलेल्या ट्रॅक्टर हाऊस (Tractor House Nashik) जवळील कन्नमवार पुलाजवळ असलेल्या झाडाझुडुपांमध्ये सुमारे 25 ते 30 वयोगटातील युवकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये सापडला. हे सर्व बघून मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (Police Station) व त्या जागेचा ताबा घेतला.
या मृत व्यक्तीजवळ एक पाकीट सापडले असून त्या पाकिटात तीन वेगवेगळ्या नावाचे ओळख पत्र ल सापडले आहे. त्यामुळे निश्चित नाव समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करताय.
याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा (Bhadrakali Police Station) दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निंबाळकर (Police Inspector Nimbalkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतर्गत वादातून हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी तरी समोर येत असल्याचे समजते.
घटनास्थळी पोलिस उपायुक्त अमोल तांबे, विभाग दोनच्या सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नवनाथ तांबे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी बाबत मार्गदर्शन केले.
शहरातील हे सत्र कधी थांबेल हे बघणं महत्त्वाचे आहे. सतत होणाऱ्या खुनाच्या घटनेने नाशिक मात्र हादरले आहे हे नक्की.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम