लक्ष्मण पवार । हतगड
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सुरगाणा तालुक्यातील फॉरेस्ट कनाशी वनपरिक्षेत्र अंतर्गत हतगड वनपरिमंडळ गट नंबर २५८ मध्ये वन तळे स्थानिकांच्या सहकार्याने भौगोलिक परिस्थितीची माहिती क्षेत्र भेट आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्वांच्या सोयीनुसार वनतळे ठेकेदार पध्दतीने देऊन बांधण्यात येत आहेत.
हतगड हा भाग डोंगराळ असल्याने पावसाचे पाणी डोंगर उतारावरून छोट्या मोठ्या नाल्यातून (ओहळातून)थेट पाणी वाहून जाते. त्यामुळे पावसाळा संपल्यावर काही काळाने नाले (ओहळ)कोरडे पडतात. यापैकी काही नाल्यावर परिसरात पाण्याची पातळी वाढावी ,पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही.
गुरां ढोरांबरोबर शेजारील शेतकऱ्यांना शेतीला ही लाभ होईल. तसेच जंगलातील बिबट्या, तरस, रानडुक्कर, मोर,आणि विविध वन्यजीव पशु पक्षी तसेच साप यांची उन्हाळ्यात परवड थांबेल ,आणि वृक्ष वेलिंना पाणी मिळून हिरवाई मूळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल, असे विचार करून फॉरेस्ट विभाग कनाशी वनपरिक्षेत्र अधिकारी व हतगड वनपरिमंडळ अधिकारी यांनी मातीचे ठीक ठिकाणी छोट्या मोठ्या नाल्यांवर (ओहळात) वनतळे बांधण्याचे निश्चित केल्यामुळे हतगड परिसरात ठेकेदार पध्दतीने काम देऊन JCB च्या साह्याने वनतळे केले जात आहेत. त्यामुळे स्थानिकांचा सहभाग वाढला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम