वणी येथे घरात गळफास घेत तरुणाची आत्महत्या

0
72

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (दिंडोरी) : वणी येथे एका तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सापुतारा रस्त्यावरील वणी शिवारात ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वणी शिवारातील राजेंद्र जाधव यांच्या शेतातील घरात एक तरुण भाड्याने वास्तव्यास होता. दिंडोरी तालुक्याच्या भनवड येथील रामचंद्र चौधरी यांचा 27 वर्षीय मुलगा गोविंद रामचंद्र चौधरी याने गुरुवारी घरात कोणी नसतांना घरातील फॅनच्या अँगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोविंद चौधरी याच्या अकस्मात आत्महत्या करण्याने चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here