लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस संपन्न

0
52

नाशिक प्रतिनिधी : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नाशिक येथे गणित विभागा मार्फत गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षाप्रमाने याहीवर्षी थाटामाटात संपन्न झाला.

यानिमित्ताने पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट कॉमपिटिशन , पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तसेच विविध गणित तज्ञांचे चित्रप्रदर्शन असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. गणित विभागातील सर्वच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेगवेगळ्या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सी.ई.ओ. आदरणीय डॉ. जयेशचंद्र पै. साहेब उपस्थिती होते.

प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी गणिताचे विज्ञानातील महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून पै. साहेबांनी गणिताच्या विविध पैलूंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अधिकाधिक उत्तम पद्धतीने शिक्षण घेऊन भारताचे आदर्श नागरिक म्हणून आपली भूमिका युवकांनी निभावणे गरजेचे असल्याचे मत स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही. आर. निकम यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख डॉ. ए. पी. भदाणे व त्यांच्या सर्व सहकारी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी गणित विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थीत होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here