द पॉईंट नाऊ ब्युरो : नांदेड येथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्या अमोल सुंकवाड असे डॉक्टरचे नाव आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र ही आत्महत्या आहार की अजून काही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड येथील रेल्वे स्थानकासमोर असलेल्या पंजाब लॉज मध्ये एका महिलेचा गळा आणि हात चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. ही महिला डॉक्टर गेल्या 23 मार्च पासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिला डॉक्टरच्या हातात कटर आढळल्याने ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
महिला डॉक्टर नांदेड जिल्ह्याच्या भोकर येथील रहिवासी आहे. हा मृतदेह ज्या रूम मध्ये बंद होता, तो रूम आतून बंद होता. तर महिलेच्या शरीरावर जखमा आणि रूम मध्ये दोरी, औषधे, कटर आढळून आल्याने शंका उपस्थित केली जात आहे.
या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सर्व तपासाअंतीच खरी माहिती स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम