लीला काही संपेना ; ‘देवबाप्पा’ बनले ‘कान्हा’ अन फोडली हंडी

0
159

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर जवळ गुरुबाप्पा माऊलीचे आश्रम आहे. याच आश्रमात गोकुळाष्टमीच्या दिवशी देवबाप्पा अर्थात समाजात ‘फरशिवालेबाबा’ म्हणून प्रचलित असणारे महाशयांनी स्वतःला चक्क कृष्ण समजून कृष्ण लीला सुरू केल्याचा व्हिडिओ द पॉईंट नाऊ च्या हाती लागला आहे.

https://youtu.be/Luas0Qot1l8

या व्हिडीओ मध्ये श्रीकृष्ण यांच्या गाण्यांवर नृत्य करतांना नृत्यांगना व काही युवक दिसतायत तर हे बाबा भक्तांच्या मध्येभागी उभे राहून या सर्व प्रकाराचा आनंद घेतांना दिसतायत. सर्व गाणे झाल्यानंतर शेवटी दहीहंडी या स्वयंम घोषित कृष्णाच्या हातून फोडली जाते

भक्त परिवार व नृत्य कला सादर करणारे काही युवक युवती शेवटी बाबांना त्यांच्या आसना पर्यन्त नृत्य सादर करत घेऊन येताय. तर काही भक्त या महाशयांना हार घालून त्यांची पूजा करताय तर शेवट त्यांच्या आरती ने होतो.

देवावर असणारी श्रद्धा कधीही चांगली मात्र या श्रदेच्या नावाखाली स्वतःला अवतारी पुरुष समजून लोकांकडून सेवा करून घेणं यात मात्र कौतुकास्पद काहीही नाही. स्वतःला साधू समजून घेत असतांना साधूंनी लोभा पासून प्रसिद्धीच्या हव्यासापासून दूर राहणे गरजेचे आहे. मात्र या स्वयंघोषित बाबांना धिंगाणा घालणे जास्त महत्वाचे वाटते.

सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व बंदी असतांना बाबांना मात्र स्वतःची सेवा करून घ्यायचा मोह काही आवरला नाही. त्यांनी धुमधडाक्यात दहीहंडी साजरी केली, एक जबाबदार पणा मात्र या महाशयांना किंचितही दिसला नाही.

हे महाशय गुरुबाप्पा आश्रमचे मुख्य मालक आहेत तसेच ते आयुर्वेदिक औषध देतात, खूप दुरून तसेच परराज्यातून लोक त्यांच्या कडे श्रद्धेपोटी येत असतात. तळेगाव फाटा समोर तुपादेवी येथे त्यांचं हे आश्रम आहे. त्र्यंबकेश्वर पासून साधारण 4 ते 5 किमी अंतरावर हे आश्रम आहे. याठिकाणी यांचे सर्व काम चालत असतात.

फरशीवाले बाबांचे फॉलोवर्स पर राज्यात देखील आहेत तसेच मराठी अभिनेते यांच्याशी देखील त्यांचे संबंध आहेत.

हा बाबा कॅन्सर वर औषध देतो तसेच पूजा होमहवन शांती करतो, यामुळे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी यांनी जबाबदारीचे भान ठेवून वागणं गरजेचे असतांना , सरकारच्या नियमांची पायमल्ली ते करत असतात.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here