प्रतिनिधी द पॉइंट नाऊ : डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांनी आज लासलगाव येथे रेल्वे स्टेशन ला भेट दिली असता लासलगाव कोटमगाव येथील रेल्वे लाईनच्या पुलाखाली कि. मी.२३३ पोल नं.३ व ५ जवळ दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्यामुळे सदर पुलाखालील राज्यमार्गाचा भाग हा गेल्या काही वर्षांपासून पावसाने पूर्णपणे खचून गेला असुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, व नागरिकांना येजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते .
त्यामुळे गेट १०४कि. मी.२३३ पोल नं.३व५ येथे आपण नवीन R U B (रेल्वे अंडर ब्रिज )अथवा नवीन गेटची व्यवस्था करून देण्यात यावी व गोदावरी एक्सप्रेस चालू करणे व कामयानी एक्सप्रेस थांबा मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले ,त्यावेळीडी आर एम साहेबांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णाताई जगताप, कोटमगाव चे सरपंच तुकारामजी गांगुर्डे, भुसावळ मंडल रेल्वे सल्लागार सदस्य राजाभाऊ चाफेकर, सरचिटणीस नितीनजी शर्मा, निलेशजी लचके, गणेश सानप, खिलवानी, मंडल अध्यक्षा स्मिताताई कुलकर्णी, जिल्हा चिटणीस ज्योतीताई शिंदे, मंडल उपाध्यक्ष रुपाताई केदारे हे उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम