लाचखोर ‘झनकरांचा’ कोठडीतील मुक्काम वाढला

0
144

द पॉईंट प्रतिनिधी : गेल्या आठवड्यात आठ लाखांची लाच घेतांना अटक झालेल्या लाचखोर लाचखोर डॉ.वैशाली झनकर- वीर यांच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या कोठडीचा मुक्काम वाढणार आहे.

झनकर यांना याआधी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र डॉ झनकर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

झनकर याना आज पुन्हा नाशिकच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दोन दिवस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे पोलिसांना चौकशी करता आली नाही, त्यामुळे त्यांच्या कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय अपेक्षित आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here