रेल्वेने प्रवास करताय ? मग जाणून घ्या मुंबईतील कोणत्या स्थानकांवर वाढले आहेत प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर

0
20

मुंबई प्रतिनिधी : रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते . रोज हजारो नागरीक ह्या लाईफ लाइनने प्रवास करतात परंतु , रेल्वेच्या म्हणण्या नुसार मागच्या महिन्याभरात अनावश्यक अलार्म चेन पुलिंगच्या घटना वाढल्याचे चित्र दिसून आले आहे . उन्हाळी हंगामात ह्या घटनांना चाप लावण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबईतील काही स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे .

       प्रवाशी उशीरा येणे , मध्यभागी स्टेशनवर उतरणे ह्या शुल्लक कारणांसाठी चेन पुलिंग करतात . मिंटच्या आवालानुसार १ एप्रिल ते ३१ एप्रिल दरम्यान मुंबई विभागात चेन पुलिंगच्या एकूण ३३२ घटनांची नोंद करण्यात आली आहे . त्यामधील ५३ प्रकरणे ही वैध कारणांखाली आणि २७९ प्रकरणं ही अनावश्यक कारणांखाली नोंदवण्यात आली आहेत . तर १८८ जण भारतीय रेल्वे कायद्यानुसार योग्य कलमांअंतर्गत दोषी आढळुन आले आहेत . तसेच आत्तापर्यंत सुमारे ९४००० रुपयांपर्यंत दंड टोठावण्यात आला आहे .

        बहुतांश गुन्हेगार हे रेल्वे पोलिसांची सतर्कता व प्रवाशांच्या मदतीने पकडले जात आहेत . तर अनेक अज्ञात लोकांवरही गुन्हे दाखल कण्यात आले आहेत .  त्यामुळे बेशिस्त प्रवाशांना चपराख बसावी म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने ९ तारखेपासून म्हणजेच आज पासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( CSMT ) , दादर ( Dadar ) , लोकमान्य टिळक टर्मिनस ( LTT) , ठाणे ( Thane ) , कल्याण ( kalyan ) , आणि पनवेल ( Pnavel ) ह्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकोटांची किंमत १० रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत वाढवली आहे . ही तात्पुरती दरवाढ प्रवाशांकडून नियमांचे पालन व्हावी म्हणून करण्यात आल्याकारणाने फक्त ९ मे ते २३ मे पर्यंतच कार्यरत असणार आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here