ही लूटमार नाही का? संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर थेट निशाणा

0
11

शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. यातच शिवसेनेच्या राऊतांनी आज पुन्हा ट्विट करत भाजपच्या किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. तपास यंत्रणेच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून सोमय्यांना करोडो रुपये मिळाले. ही लूटमार नाही का? असा सवाल देखील संजय राऊतांनी केला आहे.

गेल्या २०१३ मध्ये किरीट सोमय्यांनी एका कंपनीवर आऱोप केला होता. काही काळाने २०१६मध्ये या कंपनीवर ईडीने कारवाई केली.युवक प्रतिष्ठानमध्ये काही वर्षांपासून कोट्यावधी रुपये आले आहेत. यामध्ये काही बिल्डर्स आणि कंपन्यांचे पैसे आहेत. तुम्ही क्रोनोलॉजी समजा, असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे. याविरोधात तपास यंत्रणा आणि चारीटी कमिशनकडे तक्रार दाखल केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीस सरकाच्या काळामध्ये युवक प्रतिष्ठांनला पैसे मिळाले आहेत. किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडीच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून करोडो रुपये कसे काय मिळतात? ही लूटमार आहे की हा काळा पैसा पांढरा करण्याचा घाणेरडा खेळ आहे का? हिशोब तर द्यावाच लागेल, असा टोला देखील लगावला आहे. भ्रष्टाचार विरोधी लढण्याचे ढोग करणाऱ्यांचा मुखवटा महाराष्ट्राच्या जनते समोर फाडला जाईल. या प्रकरणात ईडी आणि इओडब्ल्यूकडून चौकशी का केली जात नाही? असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here