एका रात्रीत हे काय झालं?

1
190

द पॉईंट नाऊ ब्युरो  ;  आजकाल कोणत्या वेळी अचानक काय होईल, सांगता येत नाही. काँग्रेस (Congress) च्या बाबतीत देखील तसच झालंय.

देशातल्या मेघालय (Megha kay) या राज्यात काँग्रेस साठी मोठा अणुबॉम्बच पडण्यासारखी घटना घडली आहे.

मेघालय मध्ये काँग्रेस चे 11 आमदार (MLA) रात्रीत फुटून तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये दाखल झालेत. त्यामुळे काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेस चे माजी मुख्यमंत्री (Ex. Chief Minister) मुकुल संगमा (Mulila Sangama)हे आपल्या सहकारी 11 आमदारांना घेऊन तृणमूल काँग्रेस मध्ये दाखल झाले आहेत.

मुकुल संगमा हे काँग्रेस चे मेघालय मधील प्रमुख नेते होते. त्यामुळे काँग्रेस साठी ही मोठी धक्का देणारी च बातमी आहे.

काँग्रेस चे एकूण 17 आमदार इथे आहेत. आणि त्या पैकी आता 11 आमदारांनी काँग्रेस ला सोडचिट्ठी दिली आहे.

त्यामुळे मेघालय मध्ये हा मोठा राजकीय भूकंप च झाला आहे.

राजकारणात कोणत्या वेळी काय होईल? हे सांगता येत नाही. त्यात पक्ष बदलणं म्हणजे, वाहत्या वाऱ्याच्या दिशे सोबत वाहत जाणं असं आहे.

आणि कोणत्याही पक्षातील कोणत्याही नेत्यास पक्ष बदलणं हे काही विशेष नाही.

आता मेघालय मध्ये ही अचानक पणे रात्री हा राजकीय भूकंप झाला. आणि काँग्रेस ला जोरदार झटका बसला.

आजकाल राजकारणात दिवसा असो, रात्री असो किंवा मग पहाटे. काय होईल, काहीही सांगता येत नाही.

महाराष्ट्रात (Maharashtra) पहाटेचा शपथ विधी असाच गाजला. ज्यात भाजप (BJP) चे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे अजित पवार (Ajit Pawar) यांनी, भल्या पहाटे राज्यपाल निवास स्थानी शपथ विधी पार पाडून सरकार स्थापन केल्याचे जाहीर केले.

यामुळे सगळीकडेच राजकीय वर्तुळात जणू हाहाकार माजल्या सारखे झाले.

तसेच आता इथे मेघालयात झाले आहे. इथे रात्री मध्येच काँग्रेस चे 11 आमदार एका माजी मुख्यमंत्र्या सह तृणमूल काँग्रेस मध्ये दाखल झाले. हा काँग्रेस साठी मोठा धक्काच आहे.

तृणमूल काँग्रेस च्या ममता बॅनर्जी यांनी आत्ता पर्यंत राष्ट्रीय पातळीवर अनेक पक्षांचे मोठमोठे मासे आपल्या गळाला अडकवलेत.

आणि आता देखील त्यांनी हा बॉम्ब फोडून काँग्रेस ला जोरदार धक्का दिलाय.

ममता बॅनर्जी या देशात काँग्रेस ला कमकुवत बनवून भाजप ला मदत करत असल्याची चर्चा आहे.

सध्याच्या घटनांवरून हेच दिसून येतंय. मात्र यात कितपत आणि काय सत्य आहे? हे ममताच जाणोत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here