कोव्हॅक्सिन लस ५० टक्केच परिणामकारण !

0
44

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस बनवताना भारताचा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने अलग केलेल्या कोरोना विषाणू चा नमुना वापरला होता.

ही लस दिल्यानंतर शरीरातली रोगप्रतीकारक शक्ती कोरोना विषाणुची रचना ओळखु शकते. त्यामुळेच रोगप्रतीकारक शक्तीला कोरोनाशी लढणे सोपे होते.

भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लशीची जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली असली तरीही या लसीच्या दोन मात्रा कोरोनाशी लढण्यात केवळ 50 टक्केच परिणामकारक ठरत असल्याचे पाहिल्यास प्रत्यक्ष पाहणीतून समोर आलंय  द लँन्सेट इन्फेक्शन डिसीजेस जनरल मध्ये हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहेत.

नागरिकांना प्रतिबंधक म्हणून दिली जणारी लस ही आणीबाणीच्या परिस्तिथीतील कशी मंजूर होऊ शकते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यानंतर लॅन्सेटनेच केलेल्या एका सर्वेक्षणा मध्ये कोव्हॅक्सिन ही कोरोना विरोधात ७७. ८ टक्के परिणाम कारक असल्याचे म्हंटले आहे.

मात्र ताज्या पाहणी नुसार कोव्हॅक्सिन ही लस केवळ निम्म्या क्षमतेने कोरोना विरोधात उपकारक ठरत असल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षण काळात भारतात दुसरी लाट कार्यरत होती , आणि चाचणीसाठी जे नमुने घेण्यात आले, त्या पैकी ८० टक्के रुग्णांमध्ये डेल्टा विषाणू आढळला आहे.

कोरोनाविषाणू आणि डेल्टा विरोधात या लसीचा परिणाम कारकते विषयी अधिक संशोधन व्हायला हवे असे तज्ञांचे मत आहे.

कोव्हॅक्सिन 50 टक्केच परिणामकारक असली तरी तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचं द लॅन्सेटने म्हंटल आहे. त्या मुळेच कोरोना काळात लसीकरना बरोबरच इतरही काळजी घेणे गरजेचे आहे असेही सांगण्यात आलं आहे.

 

 

 

हेही वाचा ;

एका रात्रीत हे काय झालं?

एका रात्रीत हे काय झालं?

 

द पॉईंट नाऊ ब्युरो  ;  आजकाल कोणत्या वेळी अचानक काय होईल, सांगता येत नाही. काँग्रेस (Congress) च्या बाबतीत देखील तसच झालंय. देशातल्या मेघालय (Megha kay) या राज्यात काँग्रेस साठी मोठा अणुबॉम्बच पडण्यासारखी घटना घडली आहे.मेघालय मध्ये काँग्रेस चे 11 आमदार (MLA) रात्रीत फुटून तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये दाखल झालेत. त्यामुळे काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेस चे माजी मुख्यमंत्री (Ex. Chief Minister) मुकुल संगमा (Mulila Sangama)हे आपल्या सहकारी 11 आमदारांना घेऊन तृणमूल काँग्रेस मध्ये दाखल झाले आहेत. मुकुल संगमा हे काँग्रेस चे मेघालय मधील प्रमुख नेते होते. त्यामुळे काँग्रेस साठी ही मोठी धक्का देणारी च बातमी आहे. काँग्रेस चे एकूण 17 आमदार इथे आहेत. आणि त्या पैकी आता 11 आमदारांनी काँग्रेस ला सोडचिट्ठी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here