राज्यात उष्मघाताचे प्रमाण चिंताजनक ; नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांवर संकट वाचा सविस्तर…

0
19

नाशिक प्रतिनिधी : राज्यात कधी अवकाळी तर कधी उष्मघात यामुळे मानवी जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यासह (Nashik District) संपूर्ण राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट झाली. त्यात शेतकरी संकटात सापडलेला असल्याने शेतपिकावर अनेक आजार उदभवले आहेत. पावसाने वातावरणात बदल झाले असून सध्या रात्री थंडी (Cold) तर दिवसा ऊन, प्रचंड उष्णता असल्याने मानवाला देखील अनेक शारीरिक त्रास जाणवत आहेत…

वातावरणात प्रचंड बदल झाल्याने पुढील तीन दिवस जिल्ह्यात तापमान (Temperature) मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केला आहे. यामुळे नागरिकांनी बाहेर पडतांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.

गुजरात राज्य व महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक, व कसमादे ठाणे मुंबई तालुके व शहरी क्षेत्र तसेच संपूर्ण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ३ दिवस गुरुवार पासून १७ मार्चपर्यंत ३८ ते ४० डिग्री तापामानापर्यंत वाढ होऊन चांगलीच उष्णता जाणवू शकते.

पुढील ८ दिवस म्हणजे सोमवार दि. २१ मार्चपर्यंत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण अथवा अवकाळी पाऊस किंवा गारपीटीची शक्यता नाही. त्यामुळे पिके काढणी करावी, असे खुळे यांनी म्हटले आहे…


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here