राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वर्तमानाबरोबर भविष्यही जळत – भारत दिघोळे

0
18

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आधीच बोगस बियाणे महागडी खते अवकाळी पाऊस गारपीट अशा विविध संकटाने कांदा उत्पादक शेतकरी बेजार झालेला असतांना केंद्र सरकार मधील व राज्य सरकारमधील आमदार-खासदारांपासून मंत्रीही दिखाव्यापुरतेच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात.

एकीकडे केंद्र सरकार कांद्याची निर्यात जास्तीत जास्त व्हावी यासाठी कुठले पाऊल उचलत नसल्याने कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झालेली आहे तर दुसरीकडे राज्य सरकारच्या महावितरण कडून सततच्या लोडशेडिंगमुळे व वीज पुरवठा खंडित केल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होऊन जिल्ह्यातील हजारो हेक्‍टर कांदा पाण्याअभावी जळून गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शंभर टक्के आर्थिक उत्पन्न बुडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वर्तमाना बरोबर भविष्यही खराब होत असल्याचे चित्र नाशिक जिल्ह्यात बघावयास मिळत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले ते काल सायंकाळी तालुक्यातील ठाणगाव येथे रामदास हरिभाऊ गरुडे व सागर शेळके यांच्या शेतात भेटीप्रसंगी बोलत होते.

दोन दिवसांपूर्वी श्री गरुडे यांनी स्वतःच्या शेतातील साडेतीन एकर कांदा पाण्याअभावी जळून गेल्याने ट्रॅक्टरने नांगरून टाकला तर सागर शेळके यांनी आपला कांदा जाळून टाकला होता या शेतात कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष श्री दिघोळे यांनी भेट देऊन पाहणी केली त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद करताना श्री दिघोळे म्हणाले की कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशांमध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावरती शेती व्यवसाय करण्याचे करून जरी ठरवले तरी आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतीतून शाश्‍वत नफा तर दूरच परंतु उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना हे दिवस आले असून जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार खासदार हेमंत गोडसे, सुभाष भामरे, यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी शेतकऱ्यांना प्रति वरवरची सहानुभूती दाखवण्या ऐवजी थेट केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून देशातून जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी व शेतीला 24तास अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी जोरदार यशस्वी पाठपुरावा करावा किंवा शेतकऱ्यांना स्पष्ट सांगून द्यावे की तुमचे तुम्ही बघा आमच्याकडून तुमच्यासाठी काही होणे शक्य नाही परंतु खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवू नये.

देशात शेतमाल सोडून सर्वच गोष्टींचे बाजार भाव वाढलेले असतांना कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात कांद्याची सुत्र पूर्णपणे राज्यकर्त्यांच्या हातात गेले आहे आता याच राज्यकर्त्यांनी कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शीघ्र गतीने कृती करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवू असे दिघोळे यावेळी म्हणाले.

यावेळी रवींद्र शेळके, नितीन शेळके, मोहन शेळके, गणपत भवर, महेश शेळके, सागर बोराडे, संपतराव शेळके, रमेश शेळके, राजू शेळके, नवनाथ कोंढरे, किशोर शेळके, किशोर कोंढरे, रुषिकेष भवर, माधव शेळके, प्रमोद भवर,तुषार शेळके, समाधान शेळके, भूषण भवर आदि शेतकरी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here