
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, आज पुन्हा दुर्घटना होता होता वाचली आहे. कोकणगाव येथे आज सायंकाळी सहा वाजे च्या सुमारास पिंपळगाव कडून नाशिक ला जाणारी बस महामार्ग क्रमांक 3 वर असलेले कोकणगाव येथे शनी मंदिरा जवळ ओवरब्रिज वरती हायवेलामोठा खड्डा असल्यामुळे यामध्ये बस चालकास खड्डा न दिसल्यामुळे बस त्या खड्ड्यांमध्ये गेली असल्याकारणाने चालकाचे ताबा सुटल्याने व बस हायवे डिव्हायडर वरती चढून गेली या अपघातामध्ये मध्ये कोणाला काही लागले नाही व अनर्थ टळला.
या अपघाताची पोलिसांना माहिती मिळताच पिंपळगाव बसवंत पोलिस घटनास्थळी धाव घेतली.
बस चे नुकसान झाले. हायवे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे असे अपघात वारंवार घडवून येत आहे .अशा वारंवार घटना घडत असल्याने बसप्रवासी यांनी व स्थानिक नागरिकांनी हायवे प्रशासनाच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे.
सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही .म्हणून या गोष्टी कडे दुर्लक्ष करून चालणार नाही हायवे प्रशासनाने या गोष्टी वर गंभीर होणे गरजेचे आहे अन्यथा ग्रामस्थांच्या
वतीने आंदोलन करण्यात येईल.
– राहुल गवळी सामाजिक कार्यकर्ता कोकणगांव.
पूर्ण भारतात हा हायवे नॅशनल 3 म्हणून ओळखला जातो थेट मुंबई आग्राला जोडणारा आहे पण त्या पद्धतीचा कामाचा दर्जा दिसून येत नाही ही गंभिर बाब आहे
– विशाल केदारे स्थानिक रहिवाशी
Edit Bye – Mukund Pingale
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम