नाशिक प्रतिनिधी : म.वि.प्र. औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक गंगापूर रोड येथे दि. १३/१/२०२२ रोजी १५ ते १८ वय गटातील विद्यार्थी यांच्या करीता कोविड लस(लसीकरण)आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या शुभारंभ हा नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ करताना मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी सुदर्शन कोकाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लसीकरणा निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना लसीकरणा बद्दल माहिती व जनजागृती करण्याचे मोलाचे मार्गदर्शन प्राचार्य आर बी पाटील यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदला व लसीकरण करून घेतले.
कार्यक्रमास महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे डॉ. श्रद्धा बिन्नर , डॉ. तेजस कापडे, सिस्टर, गंगासागर भोकरे , चंद्रकला मोरे, कमल भुसारे, नंदा गांगुर्डे , भारती धनवटे, शितल भडांगे, विद्या ठाकरे आयटीआय प्राचार्य व गटनिदेशक , निदेशक, शिक्षकेत्तर कर्मचारी हे उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम