मेडिक्लेमचे पैसे उकळण्यासाठी बनावट हॉस्पिटलची नोंदणी ; नाशिक शहरातील धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर

0
53

नाशिक प्रतिनिधी : लोक पैसे कमवण्यासाठी कुठल्याही स्थराला जातील यात शंका नाही. नाशिक शहरात हॉस्पिटलचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र बनवून त्याचा उपयोग मेडिक्लेम (Mediclaim) मंजूर करून घेण्यासाठी केल्याप्रकरणी राणेनगर येथील एका डॉक्टर विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की डॉ. बापूसाहेब भागवत नागरगोजे (४२, रा. प्लॉट नंबर २०, शिवांजली लेन नं.४, कलानगर, दिंडोरी रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राणेनगर येथील सुमन हॉस्पिटलचे डॉ. भरत शिवदास कांबळे याने १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यान हॉस्पिटलचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र तयार करत होता. त्याचा वापर इन्शुरन्स कंपनीकडून मेडिक्लेम द्वारे पैसे उकळण्यासाठी करण्यात आला आहे.

या बाबत सुमन हॉस्पिटलचे डॉ. भरत शिवदास कांबळे याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास व.पो.नी. भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी. निलेश राजपूत करत आहेत. हे असल्या प्रकारांनी वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here