द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात पाणीसागर पोलीस स्टेशन हद्दीत मशीद 30 ऑक्टोबर ला पाडण्यात आल्याचे पडसाद आज राज्यभर उमटले आहेत. मालेगाव ,नांदेड मध्ये आज काढण्यात आलेल्या मोर्चाला गालबोट लागला असून, मोर्चेकऱ्यां द्वारे पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तर त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात आज मालेगाव मध्ये आंदोलक वर्गाने आक्रमक होत , थेट पोलिसांवर हल्ला केला. तर अनेक ठिकाणी तोडफोड केली आहे. पोलिसांनी मोर्चा काढण्याऱ्यांना अडवले असता, आंदोलकांनी अरेरावी करत थेट पोलिसांना निशाणा बनवलं आहे. तर काही ठिकाणी गाड्यांचे काच फोडले. यामुळे वातावरण तापले असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
घटनेचे मूळ बांगलादेश
दुर्गापूजे दरम्यान बांगलादेश मध्ये मंडप मुस्लिमांनी जाळला होता, त्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी मशिदीवर हल्ला झाला होता. त्याचेच पडसाद म्हणून आज महाराष्ट्र मध्ये मोर्चे निघाले. मात्र या मोर्चा मध्ये पोलिसांना थेट टार्गेट करण्यात आल्याने, मुंबईतील रझा अकादमीच्या पाच वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती आज मालेगावमध्ये घडली.
यावेळी भाजपा व आर एस एस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. नांदेड, मालेगाव, अमरावती या ठिकाणी आंदोलनाने पेट घेतला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली आहे. अमरावती मध्ये भाजपा कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी घटनास्थळी पाचारण केलेल्या शीघ्र कृती दलाच्या जवानांसह वाहनांवर देखील संतप्त जमावातर्फे दगडफेक सुरू करण्यात आल्याने पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लाठीमार करत जमावास पिटाळून लावले.
या घटनेने शहरात तणावाचे वातावरण पसरून भितीने दुकाने पटापट बंद करण्यात आली. बंद दुपारपर्यंत शांततेत पार पडत असतांना, अचानक काही भागातून तरूणांचे मोर्चे किदवाई रोडवरील शहीद टॉवरजवळ येवून धडकले.
मात्र शांतता राखणे गरजेचे आहे. ‘ द पॉईंट नाऊ ‘ आंदोलकांना शांततेचे आवाहन करत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
भंगार सरकार आहे मग भंगारवाले असेच करतीलः