द पॉईंट नाऊ ब्युरो : मामा – भाचीच्या नात्याला काळिमा लावणारी घटना घडली आहे. राजस्थानमध्ये एका मामाने आपल्याच भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राजस्थानच्या जालोर शहरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला आहे.
माणसाची वासनांधता माणसाला कोणत्याही थराला पोहोचवू शकते. कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत या नराधमाने आपल्या चार वर्षांच्या भाचीला घरात एकटे पाहून तिच्यासोबत हा भयानक घाणेरडा प्रकार केला. तिच्यावर बलात्कार केल्याने ती जखमी झाली. यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान मुलीच्या बापासोबत हा नराधम आलेला होता. त्याने हे भयावह आणि संतापजनक कृत्य केले. याप्रकरणी संबंधितावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. संबंधित हा दूरचा नातेवाईक असून, नात्याने मामा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम