द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : मानूर फाटा ते मानूर गाव मारुती मंदिर मार्गे सिटीलिंक नाशिक शहर बस सेवा सुरू करावी या मागणीसाठी याबाबत नुकतेच राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान सेल जिल्हाध्यक्ष संकेत निमसे यांच्याद्वारे मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देण्यात आले.
मानूरगाव येथील नागरिकांना पंचवटी, नाशिकरोड भागात कामानिमित्त नेहमीच यावे लागते. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना देखील शाळा-महाविद्यालयात जाणे, वयोवृद्धांना दवाखान्यात जाणे अशा अनेक कारणांसाठी बससेवाच गावात उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागते. यामुळे ही सिटीलिंक बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी संकेत निमसे यांसह प्रतीक रायते, गौरव सूर्यवंशी, अनिल गोसावी, शुभम मुरकुटे, निखिल निकम, विशाल लभडे, सागर दरेकर, तुषार सानप, अक्षय मोरे, प्रितेश भदाणे, प्रमोद कदम, नारायण गुंजाळ आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम