माऊली लॉन्स परिसरात वृद्धावर युवकाचा धारदार शस्त्राने वार

0
66

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरीचे सत्र सुरूच आहे. कायद्याचा धाक शहरात उरलाय का हा प्रश्न जैसे थे आहे. रात्री उशिरा माऊली लॉन्स परिसरात इंद्रायणी मेडिकल वर एका इसमाने दगडफेक करत सैन्यदलातील सेवानिवृत्त एका ज्येष्ठ नागरिकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार वृत्त असे की माऊली लॉन्स परिसरा जवळ असलेल्या नवीन नाशिक प्रभाग सभापती सुवर्णा मटाले यांच्या संपर्क कार्यालय शेजारी इंद्रायणी मेडिकल या ठिकाणी रात्रीच्या वेळी जगदीश गांगुर्डे नामक युवकाने दगडफेक सुरू केली. हा युवक प्रचंड रागात होता.

दगडफेक सुरू असतांना तेथील नागरिक सयाजी साळुंके यांनी त्यांच्या घरासमोरील मेडिकलवर दगडफेक होत असतानाचे बघून गांगुर्डे याला धरत त्याला पकडले असता गांगुर्डे याने ज्येष्ठ नागरिक यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला.

परिसरात गर्दी मोठ्या प्रमाणात जमा झाली होती. या ठिकाणी जमलेल्या जमावाने गांगुर्डेला बेदम मारहाण केली. रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून. सैन्य दलातील निवृत्त साळुंके यांच्यामुळे मेडिकलवर होणारी दगडफेक थांबल्यामुळे त्यांचे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्यातील लढवय्या पणा हा प्रेरणादायी असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले, त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here