धुळे प्रतिनिधी : धुळे जिल्हा पुन्हा खुनाच्या खटनेने हादरला आहे. जिल्ह्यातील शिरूड परिसरात अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह झाडाला टांगला असल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास करत आहेत.
धुळे जिल्ह्यातील शिरूड परिसरात सकाळी काही नागरीकांना महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर महिलेचा चेहऱ्यावर दगडाने मारल्यानंतर तिला साडीने गळफास दिलेला आहे. विचित्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विकृत मानसिकतेतून ही घटना घडली असावी. सदर महिला आदिवासी समाजाची असून साधारण चाळीस वर्ष वयोगटातील महिला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अशा घटना महाराष्ट्रात वेळोवेळी घडत असल्याने, कायद्यांची कडक अंमलबजावणी गरजेची असल्याची गरज आज आहे. याबाबत पोलिसांना कळविले असता घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. तसेच स्वान पथक व इतर तपास यंत्रणादेखील घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास अद्याप सुरू आहे.
सर्वत्र गुंडगिरी व खुनाचे प्रमाणात वाढ झाली असल्याने पोलीस व कायद्याचा धाक उरला नसल्याचे चित्र सर्वत्र असल्याचे जाणवत आहे. या अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पाऊले उचलण्याची गरज आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम