मशीदी समोर भोंगा लावल्यास मनसे सैनिकांना जेलमध्ये जावे लागणार

0
19

नाशिक प्रतिनिधी : राज्यात दोन धर्मांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी अंबड पोलीस ठाण्याचा वतीने भोंगे लावू नये यासाठी नवीन नाशिक विभागातील मनसेच्या (MNS) शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यानंतरही भोंगे लावल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मनसेने धार्मिक मुद्दा उचलत गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभेमध्ये मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावरून सडकून टीका केली होती. तसेच माझा धर्माला विरोध नाही तर अशा प्रवृत्तीला विरोध आहे असे देखील ठाकरे म्हणाले आहेत.

यामुळे मशिदीवर सुरू असलेले भोंगे बंद करावे अन्यथा मनसेदेखील हनुमान चालिसा लावून मशीदी समोरच भोंगे लावणार असल्याचा इशारा दिला होता.

राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या या वातावरणाने तेढ होण्याची शक्यता असल्याने, सलोखा खराब होवून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह शहर संघटक अर्जुन वेताळ, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष संदेश जगताप, ललित वाघ, कामगार सेना चिटणीस तुषार जगताप, महिला शहराध्यक्ष अर्चना पाटील, जिल्हाध्यक्ष कामिनी दोंदे, उपशहराध्यक्ष अक्षय खांडरे, राजु परदेशी, देवचंद केदारे यांना १४९ अन्वये नोटीसी बजावण्यात दिल्या आहेत.

यानंतरही भोंगे लावल्यास यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अंबड पोलीस ठाण्याचे व.पो.नी भागिरथ देशमुख व पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. या नोटिशीला मनसे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here