नाशिक : एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्राध्यापिका मनिषा डोंगरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (PhD) पदवी प्राप्त झाली.
त्यांनी विद्यावाचस्पतीसाठी ‘आंबेडकरी साहित्यातून अभिव्यक्त होणारा स्रीवाद’ ह्या विषयावर प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना प्रा.इंदिरा आठवले यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्याबद्दल त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन.सूर्यवंशी, मराठी विभाग प्रमुख डॉ. कौतिक लोखंडे, डॉ.रमाकांत कराड, डाॅ.दिलीप पवार आणि ॲड.किरण शिरसाठे यांचे सहकार्य लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम