मनमाडच्या 120 फूट टेकडीवरून दोन ‘गिर्यारोहक’ कोसळून जागीच ठार

0
20

मनमाड प्रतिनिधी : नाशिकच्या मनमाडजवळील १२० फूट उंच असलेल्या ‘ हडबीच्या शेंडी ‘ डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेले तिघे गिर्यारोहक रॅपलिंग करताना डोंगरावरून खाली कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असून. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील इंद्रप्रस्थ ट्रेकर ग्रुपच्या वतीने ‘हडबीची शेंडी’ या डोंगरावर आयोजन करण्यात आले होते. ८ मुली व ७ मुले असा गृप ट्रेकिंगसाठी या ठिकाणी आलेला होता. ट्रेक पूर्ण झाल्यानंतर शेवटी डोंगराच्या खाली उतरत असताना अडकवलेल्या खिळ्यातून दोर निसटला. व तिघेजण या डोंगरावरून कोसळले.या घटनेत अमोल वाघ व मयूर म्हस्के दोघांचा जागीच मृत्यू झाला, हे दोघेही गृपचे ट्रेनर होते.तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.उर्वरित सर्व ट्रेकर सुखरूप असून स्थानिक पोलीस आणि कातरणी गावातील ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य केले.
या प्रकरणी चांदवड पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

या बाबत अधिक वृत्त असे की अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रॅकर ग्रुप ची 15 जणांची एक टीम मनमाड पासून जवळ असलेल्या कातरवाडी भागातील सेंडीच्या डोंगरावर ट्रॅकिंग करण्यासाठी आली होती त्यात मुली आणि 7 मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण डोंगरावर गेले होते सुरुवातीला ट्रेनर अमोल वाघ आणि मयूर म्हस्के हे खिळे ठोकत दोर बांधून डोंगराच्या शेंडीवर गेले त्यानंतर इतर 13 जण वरती चढले होते.

सायंकाळी 13 जण खाली शेवटी ट्रेनर अमोल वाघ आणि मयूर म्हस्के खाली येत असताना एक खिळा निखळला त्यामुळे दोर सटकली आणि पाहता पाहता दोघे जण खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघे शेंडीवरून पडल्याचे पाहून त्यांच्या सोबत असलेल्यानी आक्रोश आणि आरडाओरडा केला मात्र डोंगराची उंची जास्त असल्यामुळे खाली गावात त्यांचा आवाज पोहचू शकला नाही मात्र त्यांचे हातवारे पाहून काही तरी वेगळं घडल्याची जाणीव ग्रामस्थांना झाली .

संघरत्न संसारे, तुषार बिडगर,अमोल झालटे ,प्रवीण संसारे, राजेंद्र गांगुर्डे, संतोष झालटे, तेजस ढोणे, कल्पेश सरोदे, दत्तात्रय झालटे, ऋषी गुंजाळ, किरण झालटे, विजय संसारे, आदी तरुणांनी डोंगरावर जाऊन मयत झालेल्या दोघांचे मृतदेह खाली आणले.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्व जण प्रचंड घाबरले होते कातरवाडीच्या ग्रामस्थांनी धीर देत सर्वांना गावातील मंदिरात आणलं.दोघांचे मृतदेह मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. डोंगरावरून शेंडीची उंची 120 फूट असून या अगोदर अनेक ट्रॅकर ग्रुप ने ही शेंडी सर केली आहे मात्र या घटनेने मोठा धक्का बसला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here