भोंदूबाबाचे महिलेसोबत अश्लील चाळे ; धक्कादायक घटना नाशिकमध्ये

0
45

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज असच भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबाचा (Fake Godman) पर्दाफाश झाला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून (Annis) (अंनिस) हा भांडाफोड करण्यात आला असून या भोंदु बाबाला अटक करण्यात आली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आज गंगापूर रोडवरील (Gangapur Road) बिल्डिंग मध्ये एक इसम स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेत होता. अनेक नागरिकांना त्याने गंडवले असल्याची माहिती अंनिसकडे होती. यामुळे अनिस ने आज छडा लावला व हा प्रकार उघडकीस आला.

हे सर्व माहिती मिळाल्या नंतर पोलिसांच्या मदतीने अंनिसने एक बनावट ग्राहक या भोंदूबाबाकडे पाठवले होते. या महिलेने भोंदूबाबाकडे जाऊन मुलबाळ होत नसल्याचे सांगितले. या बाबाने महिलेला मुलबाळ होईल असे आश्वासन देत ५० हजार रुपयांची फी मागतिली. तसेच महिलेशी अश्लील वर्तन करण्याचाही प्रयत्न केला. हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असल्याने पोलिसांच्या जाळ्यात भोंदूबाबां सहज अडकला. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी या भोंदूबाबाचा पर्दाफाश केला असून त्याच्याविरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.

घडलेल्या प्रकारचा सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार (API Nitin Pawar) हे तपास करत आहेत. अंनिसकडून राज्यसरचिटणीस डॉ टी आर गोराने, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, जिल्हा प्रधान सचिव ऍड समीर शिंदे, आआपाचे जितेंद्र भावे यांनी हा भांडाफोड केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here