भुजबळ आणि मुंडे आज येणार आमनेसामने

0
145

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे आज नाशिकमधील शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमासाठी दोन्ही नेते येणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आ. देवयानी फरांदे यांनी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम करण्याचे योजले आहे. राज्याचे दोन वेगवेगळे पक्षाचे पण ओबीसी समाजाचे नेते एकाच ठिकाणी येणार असल्याने तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मागील काही महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असतांना व अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नाशिकसह राज्यातील सुमारे १८ महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ओबीसी नेत्यांच्या भुमिकेकडे सगळयांचे विशेष लक्ष लागले आहे.

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादीत नवीन इनिंग सुरू केली. यामुळे त्यांच्या अडचणीत एक प्रकारे वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नाथाभाऊ गेल्यावर त्यावेळी पंकजा मुंडे देखील शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. तर केंद्राच्या मंत्रीमंडळ विस्तरात प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळणार अशी अशा असतांना ऐनवेळी त्यांना डावलण्यात आल्याने पुन्हा चर्चांना उधान आले होते. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सिध्द झाले आहे.

तर दुसरीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून सतत विविध आरोप होत आहे. आ. सुहास कांदे यांनी जिल्हा नियोजन समिती निधीचे कारण देत अनेक आरोप केले आहे, तर त्यात सेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या नाशिक दौर्‍यात आ. सुहास कांदे यांच्याच पाठीवर हात ठेवल्याचे दिसले. यामुळे या दोन्ही ओबीसी नेते एकाच व्यासपिठावर आल्यावर काय बोलणार याची मोठी आता उत्सूकता लागली आहे. म्हणून यासगळ्या बाबींचा विचार केला असता आज मुंडे आणि भुजबळ यांच्यात कश्याप्रकारचा संवाद होतो? अथवा होत नाही हे पाहणे खरंच महत्वाचे ठरणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here