नाशिक प्रतिनिधी : किरीट सोमय्या यांनी भुजबळांना चांगलेच धारेवर धरले आहे. आर्म स्ट्रॉंग (Armstrong) कंपनीत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपला पैसा पांढरा केला. भुजबळ मुंबईत ज्या नऊ मजली घरात राहतात ती कुणाची आहे? असा सवाल उपस्थित करत भाजप नेते किरिट सौमय्या यांनी भुजबळ व राष्ट्रवादीला चांगलेच धारेवर धरले आहे. भुजबळ म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळ मुंबईत ज्या घरात राहतात ते घर कुणाचे आहे हे शोधून दाखवा असे आव्हानच सोमय्यानी केले आहे. यामुळे येत्या काळात भुजबळ विरुद्ध सोमय्या वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
सौमय्या हे सध्या वेगवेगळ्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. त्यात भुजबळ यांना सध्या धारेवर धरले आहे.सोमय्या हे नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी वसंतस्मृती (Vasant Smruti BJP Office Nashik) कार्यालयात पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर भ्रष्टाचार व मनी लाॅण्ड्रिंगचे गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत बांधलेल्या करोडो रुपयांच्या घरासाठी पैसा कुठून आणला ? मुंबईत देखील मी भुजबळ यांच्या भुजबळ महाल ची पाहणी करायला जाणार आहे. असा इशारा भुजबळांना दिला आहे.
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली नामी आणि बेनामी संपत्ती जाहिर करावी. त्यांची १२० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आज मी भुजबळ यांची आर्म स्ट्रॉंग एनर्जी कंपनीची (Armstrong Energy Nashik) पाहणी केली. या कंपन्यांमध्ये जो पैसा आला आहे तो कुठून आला. आर्म स्ट्रॉंग कंपनीत भुजबळ यांनी आपला पैशा पांढरे केले असा गंभीर आरोप त्यांनी केला. यामुळे आता ही कंपनी वादात सापडली आहे.
सोमय्या यांच्या दाव्या नुसार भुजबळ यांच्या निगडीत अनेक बोगस कंपन्या आहेत. भुजबळांची पनवेल, नाशिक, अंधेरी, सांताक्रूझ याठिकाणी असलेली मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली अशी माहिती त्यांनी दिली. ते आज नाशिक येथे असतांना भुजबळांना होम स्पीच वर चांगलेच फटकारे मारले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम