भाजपा विरुद्ध सेना संघर्ष चिघळला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वादाचे पडसाद आज सर्वत्र उमटत आहेत. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज सकाळी भाजप कार्यालय फोडत नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी भाजपचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप कार्यालय परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात सध्या तणावाची परिस्थिती असून कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने चिंता व्यक्त केली जातेय.
राणेंनी काल केलेले वक्तव्य सैनिकांना चांगलेच जिव्हारी लागले आहे. राणेंच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून आता राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापल्याचे दिसत आहे. शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली. यानंतर याठिकाणी मोठा पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम