ब्रह्मगिरीवर दरड कोसळली; सुरक्षेचे तीनतेरा

0
42

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी : ब्रह्मगिरीवर पर्वतावर दुपारी दरड कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, आज घडलेल्या या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. बेकायदेशीर उत्खनन त्यामुळे अशा घटना घडत आहेत.

सततचा पाऊस झाल्याने दरडी धसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घटनेमुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. पर्वतावर दगडी जिन्यात ब्रम्हगिरीकडे जाणार्‍या मार्गालगत गुहेजवळ वरच्या भागातून दगड खाली कोसळली. यात दोघे किरकोळ जखमी झाले आहे. सुदैवाने पर्यटक, भाविकांची संख्या कमी असल्याने आणि दगड लहान असल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. यामुळे पर्यटकांनी सध्या येणं टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच गंगाद्वार येथे देखील दगड कोसळले होते. घटना ताजी असताना आता पुन्हा ब्रह्मगिरीवर दगड कोसळले आहेत. ही घटना घडली तेव्हा पायर्‍यांवर नाशिकचे तिघे पर्यटक होते. दगड कोसळणे घटना मुळे येथे असुरक्षितता निर्माण झाली आहे. जंगलात असणार्‍या दोघा तरुणांनी त्यांना मदत करीत धीर दिला.तसेच उपचाराला आणण्यासाठी मदत केली. त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. परदेशी यानी उपचार केले. ब्रह्मगिरीचे पुजारी किरण देशमुख, संजू भोये यांंनी सुरक्षिततेच्या उपायांची मागणी वनविभागाकडे केली आहे. तसेच घटना घडल्यानंतर पोलिस आणि वनविभागाने याची माहिती घेतली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here