प्रेमप्रकरण? ; वॉर्डबॉयने नर्सच्या डोक्यात गोळी झाडून संपवले

0
40

द पॉईंट नाऊ ब्युरो : एका रुग्णालयाच्या वॉर्डबॉयने नर्सच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉय असलेला रितेश शाक्य याने नर्स नेहा चंदेल हिच्या डोक्यात गोळी झाडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. नेहा चंदेल हिचा मृतदेह स्टोअर मध्ये आढळून आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातच नेहा चंदेल हिचा विवाह होणार होता. आरोली रितेश शाक्य हा पोलिसांना शरण आला असून, त्याची चौकशी केली जात आहे.

या घडलेल्या घटनेने रुग्णालयातील नर्समध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर अशा वातावरणात आपण काम करण्यास असमर्थ असल्याचे सर्व नर्सने म्हटले आहे. CCTV कॅमेऱ्याचे फुटेज पाहून पुढील तपास पोलीस करणार आहेत. वॉर्डबॉयकडे हत्यार आले कुठून, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here