
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील भऊर येथील भुमीपुत्र व प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ, प्रंशात पवार यांना अखील भारतीय मराठा महासंघातर्फे “मराठा भुषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कटारे व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते शानदार समारंभात पवार यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ प्रंशात पवार यांनी केलेल्या वैद्यकीय सेवेची दखल घेत , तसेच नाशिक जिल्हा व शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये हजारो हृदय शस्त्रक्रिया करून खऱ्या अर्थाने गोर गरीब जनतेला जिव दान देण्याचे काम केले आहे . त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून ” मराठा भुषण” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .डॉ प्रंशात पवार यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे देवळा तालुक्यातील विशेषतः त्यांच्या मुळगावी भउर सह विठेवाडी , सावकी,खामखेडा ,बगडु परीसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे .
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक, तथा महाराष्ट्रा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव , देवळा तालुका शिवसेना तालुकाप्रमुख सुनिल पवार , प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव , वसाका मजदुर युनियनचे सदस्य दीपक पवार, मुन्ना पवार आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम