द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देशात सध्या खून , बलात्कार, अपहरण हे सर्व भयंकर घडत असतांना देशाचे , नागरिकांचे रक्षण करणारे पोलीस शिपाई अभिमान असतांना , नाशिक मध्ये मात्र एका पोलीस शिपायाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही दुर्दैवी घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली असून, याप्रकरणी संशयित पोलिसावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पोलीस शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. दीपक जठार असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.
पोलीस हा जनतेला आधार वाटत असतो मात्र दीपक जठार उपनगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे.याचे कृत्य मात्र सर्व्यांना लाजवणारे आहे. संबंधित मुलीशी आणि कुबियांची त्याची ओळख असल्याचे प्राथमिक माहिती आहे. संशयित दीपक हा विवाहित आहे. पंचवटी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला रविवारी दुपारी घेऊन गेला होता, अशी तक्रार पिडीत मुलीच्या आई-वडिलांनी सोमवारी म्हसरूळ पोलिसांकडे केली होती.
सर्व प्रकार गंभीर असून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नांदूर नाका परिसरातून दोघांना ताब्यात घेतले आणि मुलीला कुटूंबियांच्या सुपुत्र केले आहे व अपहरण करणाऱ्या पोलीस शिपायाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला या वर पोलीस तपास करत आहे.
पोलीस हे समाजात एक आदर्श म्हणून असतांना पोलिसांचे नाव बदनाम होईल असं कोणीही करू नये, हे द पॉईंट नाऊ मीडियाचे आवाहन आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम