पुण्यातील कोंढवा परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुणे येथील पालकांनी 11 वर्षाच्या मुलाला 22 कुत्र्यांसह दोन वर्षांपासून कैद करुन ठेवले होते. संशयावरून शेजाऱ्यांनी तक्रार केली असता पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकून मुलाची कुत्र्यांपासून सुटका केली. बुधवारी पोलिसांनी आरोपी आई- वडिलांना अटक केली आहे.
मुलाचे पालक दोघेही कोंढव्यातील कृष्णाई इमारतीत राहत असून त्यांनी घरात 22 कुत्रे पाळले होते. यातील अनेक कुत्रे रस्त्यावरून आणल्याचे कळाले. दाम्पत्य जेवण देण्यासाठी घरी यायचे आणि काही वेळ तिथे राहून निघून जायचे. असे पुणे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.
कृष्णाई बिल्डिंगमधील खिडकीजवळ मुलाला विचित्र कृत्य करताना आजूबाजूच्या रहिवाशांनी पाहिले, त्यानंतर त्यांनी चाइल्ड लाईनच्या अनुराधा सहस्रबुद्धे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. दिवसभर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. गेल्या आठवड्यापासून फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती, त्यानंतर शेजाऱ्यांनी तक्रार केली. पोलीस या कारवाईत दाखल झाले असून त्वरित कृष्णाई बिल्डिंगच्या फ्लॅटवर छापा टाकून मुलाची सुटका केली.
मुलाला चाईल्ड वेअफेअरच्या माध्यमातून बालसुधारगृहात पाठवण्यात आले. त्याचबरोबर पालकांनविरोधात कलम 23 आणि 28 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाम्पत्याला कुत्रे पाळण्याचा शौक असल्याने हे कृत्य त्यांनी केल्याचे सांगितले आहे.पुष्टी करण्यासाठी पोलिस गुरुवारी शाळेत जाऊन तपास केले असता, शाळा सुरू झाल्यावर त्या मुलाने शाळेतील इतर मुलांनाही कुत्र्यासारखे चावले समोर आले.अत्यंत वाईट अवस्थेत मुलगा सापडला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम