पुण्यात मोबाईल दुकान फोडून तीन लाखांची चोरी

0
11

पुण्यातील खडकवास येथील सक्सेस मोबाईल शॉपी हे दुकान फोडून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरण्यात आला आहे. सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कार्यवाही सुरू आहे.

पुणे खडकवास येथे मुख्य रस्त्याला लागून असलेल्या दुकानात मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरीची घटना घडली. दुकानाचे शटर तोडून मोबाईलचे बॉक्स पोत्यात भरून नेल्याचा सर्व प्रकार कैद झाला. केवळ महागड्या मोबाईलची चोरी केली आहे. चरवड यांनी दुकानात मोबाईल व इतर साहित्य मिळून पाच ते सात लाखांचा माल भरलेला होता. चोराने यातील केवळ महागडे मोबाईल चोरले आहेत. अत्यंत सफाईदारपणे दुकानाचे शटर उचकटून चोरटा दुकानात शिरताना आणि मोबाईल चोरताना दिसत आहे. यावरून हा सराईत चोर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळी नागरिकांनी दुकानाचे शटर अर्धवट उघडे दिसले असता माहिती दुकान मालक लोकेश चरवड यांना दिली. दुकानात येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता उघडकीस आला एक चोर मध्यरात्री अडीचच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटून आत शिरुन महागडे मोबाईल पोत्यात भरताना स्पष्ट दिसत होता. घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिक चिंता व्यक्त करत आहेत. चरवड यांनी याबाबत हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून प्रभारी अधिकारी तेगबीरसिंह संधु यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.

 

 

 

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here