द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : सतत बदल होत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी जे उत्पादन घेतल आहे त्या मालाचे भांडवल सुटणे देखील अवघड होत असतांना शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला हा शेतमाल बाजारपेठेत दुप्पट दराने विक्री केला जात असताना दिसत आहे. साधारणतः शेतकरी कंगाल आणि व्यापारी मालामाल अशी परिस्थिती दिसते आहे.
बाजारपेठात भाजीपाल्याचे दर नवनविन उंची गाठत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडताना दिसत आहे. बाजारा मध्ये गेल्यावर पिशवीभर भाजीपाला घ्यायचा असल्यास ५०० रुपयाची नोट काढून ठेवावी लागते. ह्या महागाईच्या चटक्यामुळे शेतमजुर होरपळून निघत आहे. शेतकऱ्याला पिकवता येत असले तरी विकता येत नाही.
अशातच नैसर्गिक आपत्ती, पाणीटंचाई, नित्कृष्ट बियाणे, विजभारनियमन, खते यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असताना वाढता खर्च व मिळणारे उत्पादन यांची तुलना होत त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेला हाच भाजीपाला व्यापारी वर्ग मनास येईल त्या भावाने विक्री करतांना दिसत आहे.
दरम्यान निफाडच्या बाजारपेठेत वांगे ४० रु. किलो, बटाटे ३० रु. किलो, कांदे ८० रु. किलो, हिरवी मिरची ८० रु. किलो, टोमॅटो ६० रु. किलो, भेंडी ४० रु. किलो, ढेमसे ४० रु. किलो, सिमला मिरची 60रु. किलो, लसूण ८० रू. किलो, कारले ४० रु. किलो, काकडी ४० रु. किलो, डांगर ४० रु. किलो, शेवगा ६० रु. किलो, दोडके ४० रु. किलो, गिलके ४० रु. किलो, अद्रक ८० रु. किलो, गवार ८० रु. किलो, बीट ४० रु. किलो, आंबा कैरी ४० रु. किलो, भुईमुंग शेंगा ६० रु. किलो, चवळी शेंगा ६० रु. किलो, आळूची पाने १० रु. जुडी, पुदीना १० रु. जुडी, मेथी ३० रु. जुडी, शेपू १५ रु. जुड़ी, कोथंबिर १० रु. जुडी, कांदापात ३० रु. जुडी, पालक १० रु. जुडी, ऊसळ २० रु. २०० ग्रॅम, लिंबू १० रु. चे ३ नग, मुळा २० रु. ३ नग, कोबी २० रु. गड्डा, फ्लॉवर २० रु. गड्डा, भोपळा २० रु. नग, गवती चहा १० रु. जुडी याप्रमाणे विकले जात आहेत. सध्याच्या परिस्थितीत उष्णता वाढीमुळे शेतीमशागतीची कामे ठप्प आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही.
तरी पाऊस पडल्यानंतर शेतीची कामे सुरू होतील. ह्या परिस्थितीत मजूर वर्ग मिळेल ते काम करून कुटुंबाचा गरजा पूर्ण करत असतांनाच घरातील विजबिल अन् आता भाजीपाल्याचे वाढलेले दर यामुळे सामान्य नागरिकांना कुटुंबातील आर्थिक व्यवस्था सांभाळणे अवघड झाले आहेत. तर शेतामध्ये पीक घेवूनही हवं त्या प्रमाणात उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांची सुद्धा आर्थिक कोंडी होवू लागली आहे. पाच वर्षांआधी ८० रु. असणारे पेट्रोल आज ११२ रु. लिटर झाले तर ८० रु. किलोप्रमाणे मिळणारे गोडतेलाने आज १९५ रु. अशी उंची गाठली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम