द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक शहरात दिवसा ढवळ्या बिंधास्त पणे चेन स्नॅचिंग करण्याचा प्रकार घडला आहे.
नाशिक शहरातील उत्तम नगर मध्ये ओम कॉलनीत चेन स्नॅचिंग करून दोघांनी मोठ्या शिताफीने पोबारा केला. आणि हा वेळ काही पहाटे किंवा सायंकाळचा नव्हता. तर वेळ होता सकाळी 11 वाजेचा.
चोरट्यांचा वाढलेला हा निर्धास्तपणा महिला वर्गासाठी मोठा धक्कादायक प्रकार आहे. या दोन्हीही चोरट्यांनी एका महिलेस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने घरा बाहेर बोलावले. आणि बोलण्यात गुंतवून ठेवत, महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडून काही कळायच्या आतच पोबारा केला.
उत्तम नगर मधील ओम कॉलनीत घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. एका 60 वर्षीय वृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावले. पत्ता बघण्यात गुंतवले. आणि सरळ सरळ मंगळसूत्र ओरबाडून घेत पळ काढला.
कोणताही सामान्य माणूस माणुसकीच्या नात्याने इतर कोणाही गरजूने पत्ता विचारल्यास त्याला आपुलकीने मदत करतो. मात्र पत्ता विचारण्याच्या बहाण्याने घडलेला हा प्रकार खूपच धक्कादायक आहे.
या कारणामुळे आता कोणाला पत्ता सांगायला मदत करायची की नाही? अशी भीती देखील सामान्य नाशिककरांना वाटू लागली आहे.
नुकतेच नाशिक मध्ये एका इंजिनिअरला पोलिसांनी चेन स्नॅचिंग प्रकरणात अटक केली होती. आणि इतक्यातच हा नवीन प्रकार घडून आला आहे. यामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने घडलेल्या या प्रकाराने आता कोणाला पत्ता सांगायला तरी मदत करायची का? अशी भीती सामान्य नाशिककरांना वाटू लागली आहे.
दिवसा ढवळ्या आणि तोही निवासी भागामध्येच घडलेल्या या प्रकाराने चिंता वाढवली आहे. यामुळे आता नाशिककरहो, पत्ता सांगताय, तर जरा जपूनच मदत करा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम