नाशिक प्रतिनिधी : राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेले नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी जयंत नाईकनवरे यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. त्यांची बदली राजकीय वादातून झाल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात आहे, पोलिस आयुक्त म्हणून जयंत नाईकनवरे यांना नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते.
नाशकात गेल्या अनेक दिवसांपासून पांडेय यांच्या बदलीची चर्चा सबंध शहरात होती. शहराचा दंडाधिकारी आपण असल्यामुळे परवानगी शिवाय काहीही करता येणार नाही. त्यामुळे पोलीस परवानगी वरून नाशिककर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना कंटाळले होते. अनेकांकडून यावरून नाराजी आणि रोष व्यक्त केले जात होता. आयुक्त मनमानी करतात अशी चर्चा होती.
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची तक्रार पालकमंत्री तसेच गृहविभागाकडेदेखील करण्यात आली होती. त्यामुळे लवकरच या आयुक्तांची बदली होईल अशी चर्चा शहरात सुरु होती. अखेर आज याबाबतचे आदेश गृहविभागाकडून प्राप्त झाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम