नोटप्रेस, आयएसपी प्रेस कामगारांचे काम बंद ; ‘धग’ दिल्ली दरबारी

0
43

नाशिक प्रतिनिधी : देशात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. नाशिक येथील नोटप्रेस व आयएसपी प्रेसच्या (ISP Press) कामगारांनी विविध मागण्यांसाठी उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन (Agitation) सुरु केले आहे. यामुळे अनिश्चित काळासाठी नोटप्रेसमधील छपाई बंद राहणार आहे. देशात विविध विषय असतांना सरकार समोर पुन्हा हा विषय उभा राहणार आहे.

नोट प्रेस मधील मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, स्टाफ युनियनचे सरचिटणीस अभिजित आहेर, कार्याध्यक्ष दिपक शर्मा , एससीएसटी असोसिएशनचे सरचिटणीस सिध्दार्थ पवार , कार्याध्यक्ष विकास बर्वे यांनी ही माहिती दिली आहे. उद्यापासून होणाऱ्या या आंदोलनाची धग दिल्ली दरबारी पोहचली असून तोडगा निघतो का हे बघणं महत्वाचे आहे.

आंदोलनाच्या हाकेनंतर हा मुद्दा दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांकडे उपस्थित करणार असल्याचे भाजपचे (BJP)पदाधिकारी राजेश आढाव (Rajesh Adhav) यांनी कामगारांशी चर्चेनंतर सांगितले.
प्रेसमध्ये आयएसपी मजदूर संघ ही कामगारांची मान्यताप्राप्त संघटना आहे. कामगारांसाठी स्टाफ युनियन (Staff Union) आहे. यापूर्वी संघटनांशी चर्चा करूनच व्यवस्थापन निर्णयांची अंमलबजावणी करत असे. प्रेसमधील मशिनरी जुन्या झाल्यामुळे उत्पादन घटले आहे. गेल्या महिन्यात देखील या विषयावर चर्चा झाली मात्र तोडगा निघाला नसल्याने हे हत्यार उपसले आहे.

सध्या कामगार संख्या कमी होत आहे. नोट प्रेसमधील साडेतीन हजारांवरील कामगारांची संख्या एक हजार झाली आहे. तरीदेखील संघटनांनी कामगारांना प्रोत्साहन देऊन उत्पादन कमी होऊ दिलेले नाही. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना युनियनने व्यक्त केली आहे.

कामगारांना अनेक मागण्या प्रलंबित होत्या त्यातील काही मागण्या पूर्ण झाल्या त्यात ओव्हरटाईम, इन्सेन्टिव्ह, टार्गेट अलाऊन्स, स्टॅगर लंच मिळवून दिले. व्यवस्थापन व संघटनांमधील सुसंवादामुळे प्रेसमधील शांतता व सलोखा कायम आहे. नोट प्रेसमध्ये मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू यांची नियुक्ती झाली आणि चित्र बदलले. चर्चा करून कामगार संबंधित निर्णय घ्यावे, अशी विनंती संघटनांनी त्यांना केली. मात्र, जुनी मशिनरी, खराब कच्चा माल हे दोष दूर न करता कामगारांना जास्त उत्पादनाचे लक्ष्य दिले जात आहे. जुन्या मशिनरी चा मुद्दा वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा विषय महत्वाचा असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here