निफाड शहरात आग्नितांडव दुकाने जळुन खाक ; कोट्यावधींचे नुकसान

0
47

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : निफाड शहरातील उगाव रोड वरील सात दुकाने मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ही आग विझवण्या साठी नाशिक तसेच पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन बंबाच्या मदतीने विझवली मात्र ही आग इतकी भीषण होती की यात संपूर्ण सात दुकानातिल माल जळून खाक झाल्याने दुकांनदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

आगिची माहिती सकाळी समझता बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती निफाड शहरात मंगळवार दि.7 रोजी उगाव रोड येथे मध्य रात्री 1च्या सुमारास भीषण अशी आग लागली आहे. आगीत नव्यानेच व्यवसाय सुरु झालेल्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले असून 6 दुकाने जळून खाक झाली आहे.

आगीत सर्वसाधारण पणे 1 कोटी 7 लाखांचे नुकसान झाले आहे. यात सनिज मेन्स पार्लर, प्रवीण गायकवाड यांचे साधारण 6 लाख, मेहक किड्स अँड मेन्स वेअर (कापड दुकान ), सोहेब शैख यांचे साधारण 20 लाख, ईश्वरी ऑटो सेंटर, राजेंद्र खैरे यांचे साधारण 30 लाख, समृद्धी ट्रेडर्स, रुपाली निफाडे यांचे साधारण 15 लाख, वसुंधरा हार्डवेअर, विजय निफाडे यांचे साधारण 30 लाख, महाराष्ट्र ट्रेडर्स, आरिफ अन्सारी यांचे साधारण 5लाख तसेच मल्हार खानावळ, सचिन ढेपले यांचे साधारण 1 लाख असे एकूण साधारण 1 कोटी 7 लाखाचे नुसकान झाले आहे.

नुसकानित सर्व तरुण व्यवसायिक असून त्यांनी कर्ज काढून व्यवसाय सुरु केले होते. आगीत त्यांच्या स्वप्नांची देखील राख झालेली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नसून आग विझवताना व्यवसायिक आरिफ अन्सारी यांना किरकोळ झखम झाली आहे.

आग विझन्या साठी व संभाव्या घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न केले. अग्निशमन दल उशिरा आल्याने व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. व्यवसायिकाना परत उभारी साठी आपत्ती व्यवस्थापनेतून मदत मिळावी तसेच निफाड शहरात आग विझवण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे आगविझवण्यास विलंब झाला त्यामुळे
अग्नीशामक दलाचे निफाड शहरात कार्यालय व्हावे असे सामाजिक कार्यकर्ते भिमराज साळुंके यांनी मागणी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here