नाशिक शहरात आता संचारबंदी आणि बऱ्याच गोष्टी बंद

0
52

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक शहरात आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

नाशिक मध्ये आता १४४ कलाम लागू करण्यात आला असून, दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचाबन्दी असणार आहे. यासोबतच नाशिक शहरात जलतरण तलाव, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर, वेलनेस सेंटर पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उद्याने, किल्ले, प्राणी संग्रहालये, पर्यटन स्थळे पूर्णवेळ बंद राहणार आहेत. खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून, कामाचे विभाजन २४ तासात करण्याचे निर्देश खासगी आस्थापनांना देण्यात आले आहेत. खासगी कार्यालये २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. नाशिक शहरात देखील रुग्णांची संख्या दिवसाला हजाराच्या घरात जाऊन ठेपली आहे. यामुळे प्रशासनाद्वारे हे आदेश देण्यात आले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here