नाशिक – वीज पडून पती-पत्नी जागीच ठार ; युवकासह दोन बालिका जखमी

0
11

– राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगे येथे बुधवार ता.०६ दुपारी चार वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह बेमोसमी अवकाळी पाऊस झाला. या बेमोसमी पावसात पिंपळगाव घाडगे येथील मालुंजेवाडीतील पती पत्नी भंडारदरावाडी कडे जातांना वीज पडून जागीच ठार झाले.

माहिती इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना मिळताच त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केली असून वाडीवरे येथील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचून पुढील तपास करत आहे. दशरथ दामू लोते (वय ३५) ,सुनीता दशरथ लोते (वय ३०) असे मृत पती पत्नीचे नाव आहे. दरम्यान बुधवार ता.०६ दोघे पती पत्नी गिरेवाडी येथे एका लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त आले होते. दुपारी चार वाजेदरम्यान अचानक बेमोसमी अवकाळी वादळी पाऊस विजेच्या कडकडाटासह जोरदार बरसू लागल्याने सदर पती पत्नीने पिंपळगाव घाडगे येथील गोपाळ किसन देवगिरे यांच्या शेतातील रस्त्यालगत असलेल्या बांधावर आंब्याच्या झाडाखाली निवाऱ्याला त्यांनी आसरा घेतला. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला दुर्दैवाने त्यांच्यावर अचानक वीज कोसळली आणि या घटनेत या दोन्ही पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या सोबत असलेल्या तेजस्विनी लोते ,वय ७, सोनाली लोते वय ५ या त्यांच्या दोन मुलींसह गिर्हेवाडी येथील युवक बाळू चंदर गिरे वय २० हे तिघे जण गंभीर जखमी झाले असून ही घटना स्थानिक ग्रामस्थांना समजताच पिंपळगाव घाडगे येथील सरपंच देविदास देवगिरे,भास्कर गोणके,पोलीस पाटील सविता घाडगे, शरद घाडगे यांनी तात्काळ भर पावसात घटनास्थळी भेट देऊन जखमींना तात्काळ एस एम बी टी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदर जखमींवर एस एम बी टी रुग्णालयात पुढील उपचार चालू आहे. घटनास्थळी वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, पोलीस हवालदार विलास धारणकर, भाऊसाहेब भगत, निलेश मराठे, तलाठी एस एन रोकडे यांनी भेट देऊन कार्यवाही केली.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here