नाशिक – वडील रागावले म्हणून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या

0
13

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : वडील रागावले या कारणास्तव एका 14 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक मध्ये घडली आहे. जेल रोड येथे हा प्रकार घडला. श्रद्धा दिलीप कापरे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथे राहणारे दिलीप कापरे हे त्र्यंबकेश्वर येथून प्रसाद घेऊन आलेले होते. मात्र श्रद्धाने प्रसाद जरा जास्त घेतला. यावर तिचे वडील तिला रागावले. यामुळे राग येऊन श्रद्धाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आई-वडील हे लहान मुलांना चांगल्यासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत या उद्देशाने रागवत असतात. मात्र सध्या लहान मुलांची देखील मानसिकता बदलत चालल्याचे दिसून येत आहे. केवळ आई वा वडील रागावल्याने आत्महत्या केल्याच्या बऱ्याच घटना आजवर समोर आल्या आहेत. नाशिकरोड येथे देखील ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here