नाशिक प्रतिनिधी : सध्या महाविद्यालय सुरू झाली असून पुन्हा विद्यार्थ्यांची पाऊल महाविद्यालयाकडे वळली आहेत. सकाळी औरंगाबाद रस्त्यावर (Aurangabad Road) बस (Bus) व ट्रकचा (Truck) भीषण अपघात (Accident) झाला असून. विद्यार्थ्यांना घेऊन जाताना ही बस रस्त्यात पलटी झाली होती. दोघ बाजूनी वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात सुमारे २० ते २२ विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून अपघाताचे कारण शोधण्यात येत आहे, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे मात्र असे अपघात जीवघेणे ठरू नयेत यासाठी उपाययोजना उचलणे गरजेचं आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमधील औरंगाबाद रस्त्यावर ट्रक आणि कॉलेजच्या बसचा भीषण अपघात झाला. ही बस धामणगावकडे जात असताना, सिग्नलवर बस आणि ट्रक यांच्यात अपघात होऊन बस रस्त्यावरच उलटली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम